नमस्कार
About
Sudarshan Bhagwan Nimkar
Ex MLA, Rajuraवैयक्तिक माहिती
नांव : सुदर्शन भगवानराव निमकर (माजी आमदार, राजुरा)
जन्म : दि. ५ सप्टेंबर १९६२
जन्म गांव : चुनाळा (मा) ता. राजुरा जि. चंद्रपूर
पत्ता : शिवराव नगर, देशपांडे वाडी, राजुरा जि. चंद्रपूर ४४२९०५
फोन नं. ई मेल : ०७१७३-२२२०३१ (निवास) मोबाईल क्रमांक - ९८५०३००३०३ (व्हाट्सअप), ७३५०९००३०३
nimkar3969@gmail.com
वडीलांचे नांव : भगवानराव देवाजी निमकर
शिक्षण : बि.एस.सी. (प्रथम वर्ष)
पत्नी : सौ. वर्षा सुदर्शन निमकर
मुलगा : सुशिलकुमार सुदर्शन निमकर
मुलगी : सुप्रिया प्रशांत कातकडे-निमकर (रा. वणी जि. यवतमाळ)
राजकीय प्रवास
सन १९८४ : राजुरा तालुक्यातील चुनाळा या प्रमुख ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर सन १९८४ ते १९९४ पर्यत कार्यरत
सन १९८६ : संचालक, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सह. बँक लि. चंद्रपूर पदावर सन १९८६ ते १९९१ पर्यत कार्यरत
सन १९८८ : उपाध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सह. बँक लि. चंद्रपूर पदावर सन १९८८ ते १९८९ पर्यंत कार्यरत
सन १९९८ : संचालक, राजुरा-कोरपना तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती
सन १९९९ : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर विधानसभा सदस्य म्हणून निर्वाचीत (१५४-राजुरा विधानसभा क्षेत्र)
सन २०१९ : १८ ऑक्टोंबर २०१९ रोजी केंद्रीय गृहमंत्री मा.ना. अमितजी शहा यांच्या उपस्थितीत राजुरा येथील भव्य मेळाव्यात भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश
सन २०२२ : पक्षाच्या चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा प्रवास योजना-२०२४ कार्यक्रमा अंतर्गत बल्लारपूर विधानसभा प्रभारी म्हणून जबाबदारी
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्र कार्य
अध्यक्ष : विद्या शिक्षण प्रसारक मंडळ चुनाळा ता. राजुरा जि. चंद्रपूर अंतर्गत राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा, जिवती व कोरपना या तालुक्यामध्ये ३ हायस्कुल, आदिवासी आश्रम शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागात शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने कार्य.
उपाध्यक्ष : सर्वोदय शिक्षण मंडळ, चंद्रपूर गोंडवाणा विद्यापिठाअंतर्गत सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेल्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात विज्ञान, कला, वाणिज्य, समाजकार्य, विधी महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालये, माध्यमिक विद्यालये असून मंडळाअंतर्गत संस्थेत विविध ५४ कोर्सेस च्या माध्यमातून १०००० (दहा हजार) च्या वर विद्यार्थी संख्या असून जवळपास ३७५ कर्मचारी कार्यरत आहेत.
अध्यक्ष : श्री तिरूपती बालाजी देवस्थान चुनाळा ता. राजुरा जि चंद्रपूर र.जि. नं. अ-७८० (सि) या ट्रस्ट च्या माध्यमातून विविध सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक व धार्मीक लोकपयोगी समाजकार्य सुरू आहे
प्राप्त पुरस्कार
सन १९९२ : राजुरा तालुक्यातील चुनाळा ग्रामपंचायतीचे सरपंच पदावर असतांना ग्रामपंचायतीच्या वतीने ७ एकर जमिनीवर यशस्वी वृक्षलागवड करून योग्य संगोपन केल्याबद्दल जिल्हा परिषद चंद्रपूर कडून प्रथम पुरस्काराने सन्मानित
सन २००३ : राजुरा येथे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात मोठे ३०३ रक्तदात्यांचे रक्तदान शिबीराचे आयोजन केल्याबद्दल जिल्हा रक्तपेढी चंद्रपूर च्या वतीने पुरस्कृत
विधानसभेच्या माध्यमातून संसदिय संघर्षातून मिळविलेले यश
राजुरा विधानसभा क्षेत्रात राज्यातील एकमेव नविन जिवती तालुक्याची निर्मिती
खनिज विकास निधीची जिल्ह्यातील विकासकामांकरीता मंजूरी
बंद पडलेला शासनाचा विशेष कृती कार्यक्रम पुर्ववत सुरू करण्यास मंजूरी
राजुरा तालुक्यातील भेंडाळा मध्यम सिंचन प्रकल्पाला प्रशासकीय मान्यतेसह मंजूरी
कोरपना तालुक्यातील अमलनाला मध्यम सिंचन प्रकल्पाची उंची वाढवून शेतकऱ्यांना सिंचन व्यवस्था करून देण्याचा निर्णय करवून कार्यपुर्ती
शासनाच्या विधिमंडळ समित्यांवर कार्य करून मतदार संघातील सर्व समाज घटकांपर्यंत शासनाच्या विविध योजनांची प्रभावीपणे अमलबजावणी केली
विशेष उपक्रम
श्री तिरूपती बालाजी देवस्थान चुनाळा या ट्रस्ट च्या माध्यमातून सन २००४ पासुन विविध सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक व धार्मीक उपक्रमांच्या माध्यमातून समाजकार्य
सन २००४ पासून दरवर्षी सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक व धार्मीक कार्यक्रमाचे आयोजन
दरवर्षी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराच्या आयोजनाच्या माध्यमातून आजतागायत ४५०० च्या वर दृष्टीहीनांना दृष्टी देऊन सामाजिक कार्य अवितरपणे सुरू आहे
दरवर्षी वर्षातून दोन वेळा रक्तदान शिबीराचे आयोजन करून आजपर्यत १००० हून अधिक युवकांना रक्तदानासारख्या महान राष्ट्रीय कार्यात सहभागी करण्यात आले
आरोग्य तपासणी व उपचार शिबीरांच्या माध्यमातून गरीब, दुर्बल व गरजू अपंगांना तीन चाकी सायलक व इतर लोकपयोगी साहित्य उपलब्ध करून मदतीचा हात देण्यात येत आहे